वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ८, आंधळे अभंग

देखत होतो आधी मागे प

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073095 · अभंग क्र. ८१

81.
देखत होतो आधी मागे पुढे सकळ । मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ ।
तिमिर कोंदलेसे वाढे वाढता प्रबळ । भीत मी जालो देवा ।
काय जियाल्याचे फळ ॥१॥
आता मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा ।
शरण आलो आता । निवारूनिया पापा ।
अंजन लेववुनी । करी मारग सोपा ।
जाईन सिद्धपंथे । अवघ्या चुकतील खेपा ॥धृ॥
होतसे खेद चित्ता । कांही नाठवे विचार ।
जात होतो जना मागे । तोही सांडिला आधार ।
हा ना तो ठाव झाला । अवघा पडिला अंधार ।
फिरली माझी मज । कोणी न देती आधार ॥२॥
जोंवरि चळण गा । तोंवरि म्हणती माझा ।
मानिती लहान थोर । देहसुखाच्या काजा ।
इंद्रिये मावळली । आला बागुल आजा ।
कैसा विपरीत जाला । तो चि देह नव्हे दुजा ॥३॥
गुंतलो या संसारे । कैसा झालोंसे अंध ।
मी माझे वाढवुनी । मायातृष्णेचा बाध ।
स्वहित न दिसे चि । केला आपुला वध ।
लागले काळ पाठी । सवे काम हे क्रोध ॥४॥
लागती चालता गा । गुण दोषाच्या ठेंसा ।
सांडिली वाट मग । जालो निराळा कैसा ।
पाहातो वास तुझी । थोरी करूनी आशा ।
तुका म्हणे वैद्यराजा । पंढरीच्या निवासा ॥५॥
मंगलाचरण पहिले दुसरे तिसरे काकडा भूपाळ्या वासुदेव

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग