मेघ अमृताचा जेथूनि प
83.
मेघ अमृताचा जेथूनि पवाड । दुजियाची चाड नाही तेथे ॥१॥
ते रूप अरूप सुंदर सावळे । भोगिती गोवळे सुखसिंधु ॥२॥
विराट नाटकु वैराज जुनाटु । गोपवेषे नटु नंदघरी ॥३॥
निवृत्ति सत्वर सेवि सुखसार । प्रकृति आकार लोपे ब्रह्मी ॥४॥
अर्थ:
तो परमात्मा प्रेमामृताचा मेघ होऊन गोकुळाच्या अवकाशात आला आहे. त्याला दुसऱ्या कोणाच्या सहाय्याची गरज नाही. तोच रुप रहित अमृतमय परमात्मा सुंदर सावळे कृष्णरुप घेऊन गोकुळात आल्याचे सुख सगळे भोगत आहेत. त्या विराट आशा परमात्माला कोणी जोड नसल्याने त्याचे राज्य सर्वत्र असते.तोच परमात्मा गोपवेशात नंदाघरी राहत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या सुखरुप पणाचे प्रकृती, आकार विरहित रुप संत भोगतात.
