वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 51. नंद चंपाषष्ठी नेम

नंद चंपाषष्ठी नेम.

🙏 4. संत नामदेव · ABH-083082 · अभंग क्र. ८१

81.
नंद चंपाषष्ठी नेम.

नंदाचिये घरी चंपाषष्ठी नेम । कुळी कुळधर्म मार्तं-डाचा ॥१॥
पक्कानेंही नाना रोटिया भरीत । केली अपरमित यशोदेने ॥२॥
वाघियामुरळी सांगितली दोन्ही । आला चक्रपाणी खेळतांची ॥३॥
मातेलागी म्हणे लागलीसे क्षुधा । थांबरे गोविंदा ह्मणे माता ॥४॥
घेतलीसे आळी करी लगबग । विस्तारिले सांग नैवेद्यासी ॥५॥
नेवोनिया पुढे देवांच्या ठेवीले । बोलवा वहीले आमंत्रिका ॥६॥
तोंवरी मागे तो भक्षी नारायणा । यशोदा आपण रागावली ॥७॥
दुरळ हा देव होय आता कैसे । मार्तंडाचे पिसे लागे तुज ॥८॥
करी क्षणामाजी वांकडेंचि मुख । हरी खात वीख कालवले ॥९॥
जाणीतला भाव मायेचे अंतर । करूनिया खरे दावी देव ॥१०॥
वांकडिया हाते ग्रास वाली मुखे । मुख तेंहि सुखे तैसे दावी ॥११॥
पिसाळल्यापरी करी वेडेचार । भय वाटे फार माये-लागी ॥१२॥
पूर्वी म्या सांगता नायकसी कैसा । पुढे हा वोळसा वोढावला ॥१३॥
पाचारिले देवऋषि हालविती सुपे । त्याचिया न भिये देव निघे ॥१४॥
वासोनिया डोळे तयाकडे पाहे । कांपे तया भये थरथरा ॥१५॥
मंत्रूनिया पाणी आणिला अंगारा । तयाचा मातेरा केला देवे ॥१६॥
नवसा न पावती गोकुळींच्या देवता । उपाय मागुता राहिलासे ॥१७॥
चिंतावली माय मूर्च्छ आली तीसी । झाली पोरपिसी मोहजाळे ॥१८॥
जाणोनी अंतर ह्मणे कृष्णार्पण । तेव्हा आले विघ्न दूर होय ॥१९॥
नाना ह्मणे देव पाहे कृपादृष्टी । जाणवले पोटी हाचि देव ॥२०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग