वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

पूर्वील कथा अनुसंधान

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089828 · अभंग क्र. ८२

82.
पूर्वील कथा अनुसंधान ।
राहिले होते करिता कथन ।
मतिविस्ताराचे महिमान ।
स्फुर्ती फांकोन वाहावली ॥१॥
माभळभट गेलीया वरी ।
कागासुर तो माव करी ।
येऊनिया गोकुळा भीतरी ।
बिंबवृक्षावरी बैसला ॥२॥
म्हणे फोडूनिया दोन्ही डोळे ।
बाळका करीन मी आंधळे ।
चुंचचिघाते कंठनाळे ।
फोडीन वृक्षस्थळी बैसोनी ॥३॥
काय करील ते लेकरु ।
मनुष्य मानवी ते इतरु ।
आम्हा दैत्यांचा आहारु ।
कैसेनि येती ते मजपुढे ॥४॥
कंसाचिये आज्ञे भेणे ।
करितो मनुष्यांची संरक्षणे ।
आता तो प्रेरिलेंसे तेणे ।
आड आलिया निवटीन ॥५॥
आलिया त्याचिया कैवारा ।
आकळू झके मी इंद्रादिसुरा ।
मज कोपलिया कृतातवीरा ।
कोण सामोरा येऊ शके॥६॥
निळा म्हणे ऐशिया मदे ।
मातला मनेशींचि अनुवादे ।
कंसा तोषवीन आनंदे ।
प्रतीक्षा करी कृष्णाची ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग