वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 19. संत भानुदास › 1. संत भानुदास महाराज अभंग गाथा › 1. संत भानुदास महाराज अभंग गाथा एकूण अभंग 94 › 9. गौळण

संत भानुदास अभंग गौळ

🙏 19. संत भानुदास · ABH-074182 · अभंग क्र. ८३

८३.
संत भानुदास अभंग गौळण

वृदांवनी वेणू कवणाच माये वाजे । वेणुनादे गोवर्धनू गाजे ।
पुच्छु पसरुनि मयोर विराजे । मज पाहतां भासती यादवराजे ॥१॥
तृण चारा चरूं विसरली । गाई व्याघ्र एके ठायी जाली ।
पक्षीं कुळें निवांत राहिली । वैरभाव समुळ विसरली ॥२॥
यमुना जळ स्थिर स्थिर वाहे । रविमंडळ चालता स्तब्ध होये ।
शेषकूर्म वराह चकित राहे । बाळा स्तन देऊ विसरली माये ॥३॥
ध्वनी मजुंळ मंजुळ उमटती । वांकी रुणझुण रुणझूण वाजती ।
देव विमानीं बैसानि स्तुती गाती । भानुदासा फावली प्रेम भक्ति ॥४॥

८४

जमुनाके तट धेनु चरावत ।
राखत हैं गईया ॥१॥
मोहन मेरा सांइया ॥ध्रु०॥
मोरपंत्र शिरी छत्र सुहावे ।
गोपी धरत बहीया ॥२॥
भानुदास प्रभु भगतनको बछल ।
करत छत्र छाइया ॥३॥

संत भानुदास अभंग गौळण समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग