वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 10. संत सोपानदेव काका › 1. संत सोपानदेव अभंग गाथा › 1. संत सोपानदेव गाथा हरिपाठ › 6. सोपान देवांचा हरिपाठ

सोपान देवांचा हरिपाठ

🙏 10. संत सोपानदेव काका · ABH-073737 · अभंग क्र. ८६

86.

सोपान देवांचा हरिपाठ

सोपान देवांचा हरिपाठ ६ अभंगांचा असून – ‘वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे’ हे पहिल्या अभंगाचे दुसरे चरण या हरिपाठाचे धृवपद आहे .
भजन करताना प्रत्येक अभंगा नंतर

वायाची भ्रमसी कारे गुणराशी ।
वेगे केशवासी भजत जारे

हे चरण म्हणायची पध्दत आहे ..

..
या जनार्दने पाठे जाइजे वैकुंठे । हरिनाम गोमटे मुखे घेई ।।१।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।२।।
शरीर पोसीशी काबाड असीशी । ते नये कामासी अंती तुझ्या ।।३।।
सोपान सांगतो ऐके तो दृष्टांत । हरीने मुखांत गाय वेगी ।।४।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।

87.
संसार आलिया कारण नोळखीसी । नरहरी न म्हणसी एक्याभावे ।।१।।
जपनाम विद्या तपनाम विद्या । संसार हा जन्म गेला वृथा ।।२।।
अहिक्य भजावे परात्रालागी जोडावे । ते वर्मबीज कवणा सांगावे ।।३।।
सोपानदेवे जोडले हे धन । नित्य ते स्मरण रामनाम ।।४।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।
88.
आम्ही नेणो माया नेणो ते काया । ब्रह्मी ब्रह्मलया आम्हा माजी ।।१।।
मी तूपण गेले ब्रह्मी मन ठेले । वासना ते जनी ब्रह्म जाली ।।२।।
बीज सर्वभाव आपणाची देव । केला अनुभव गुरुमुखे ।।३।।
सोपान ब्रह्म वर्ततसे सम । प्रपंचाचे काम नाही नाही ।।४।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।
89.
सागरीचे तोय जगा निवारीत । मागुते भरीत पूर्णपणे ।।१।।
तैसे आम्ही दास तुजमाजी उदास । तू आमुचा निवास सर्व देवा ।।२।।
तुजमाजी विरो सुखदुःख विसरो । तुझ्या नामे तरो येची जन्मी ।।३।।
सोपान निकट बोलोनी सरळ । तुष्टला गोपाळ अभय देत ।।४।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।
90.
दिन व्योम तारा ग्रहगण शशी । एक हृषीकेशी सर्व आम्हा ।।१।।
ब्रह्मेविण नाही रिता ठावो पाही । निवृत्तीच्या पायी बुडी देका ।।२।।
सर्व हे निखळ आत्माराम सर्व । नाही देहभाव विकल्पता ।।३।।
सोपान निकट गुरुनाम पेठे । नित्यता वैकुंठ जवळी असे ।।४।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।
91.
निवृत्ती सोपान परिसा भागवत । पंढरी निवांत विठ्ठल गाती ।।१।।
धन्य तोचि नामा ज्ञानदेव पाही । सनकादिक बाहे उभे देख ।।२।।
पुंडलिक भक्त देखोनी सर्व । शुध्द चरणभाव अर्पिताती ।।३।।
सोपान डिंगर आनंदे नाचत । प्रेमे ओवाळीत हरीच्या दासा ।।४।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग