एके दिवशी न्हावयास ।
85.
एके दिवशी न्हावयास । पाणी नव्हते विसणास ॥1॥
देव धावोनिया आले । शीतळ उदक घे घे बोले ॥2॥
आपुल्या हाते विसणी । घाली जनीच्या डोयी पाणी ॥3॥
माझ्या डोईच्या केसांस । न्हाणे नव्हते फार दिवस ॥4॥
तेणे मुरडी केसांस । का ह्मणे उगीच बैस ॥5॥
आपुल्या हाते वेणी घाली । जनी ह्मणे माय झाली ॥6॥
