वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 19. संत भानुदास › 1. संत भानुदास महाराज अभंग गाथा › 1. संत भानुदास महाराज अभंग गाथा एकूण अभंग 94 › 10. फुगडी

संत भानुदास अभंग फुग

🙏 19. संत भानुदास · ABH-074181 · अभंग क्र. ८५

८५.
संत भानुदास अभंग फुगडी

ऐक साजनी वो बाई । तुम्हा एवढें थोर नहीं ।
भाव केला घरजांवाई । खावयासी तूप सेवाई ॥१॥
फु फु फु फु फुगडी गे । तुम्ही आम्ही खेळु दोघी गे ॥ध्रु०॥
प्रपंच केला गोड सगळा गे । ज्ञान फुगडीवर समला गे ।
प्रेम तिचा चांगट गे सुदंर पहाता अलगट गे ॥२॥
शांती सोयरी सखी माझी गे । तिची बरी संगत काजी गे ।
तिचा हात धरिता गेली माझी गे । मोह ममतेची बीज माजी गे ॥३॥
फुगडी खेळता हाता शिणला गे । अंतरीचा द्वैत भेद गेला गे ।
हृदयी प्रकटला ज्ञानदीप गे । गेली अज्ञानाची झोंप गे ॥४॥
दया क्षमा तिची बहीण गे । तिशी म्यां धरीले कवळुन गे ।
फुगडी खेळतां आला शीण गे । गरगर भोंड गेली जिरुन गे ॥५॥
ऐशी फुगडी खेळले गे । परब्रह्मी सुख आगविले गे ।
भानुदास म्हणे रंगलों गे । जन्ममरण हरलों गे ॥६॥

संत भानुदास अभंग फुगडी समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग