वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ८, आंधळे अभंग

भगवंता तुजकारणे मेलो

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073096 · अभंग क्र. ८४

84.
भगवंता तुजकारणे मेलो जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाही तयासी ।
न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणता न देखो गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥
विठोबा दान दे गा तुझ्या सारिखे नामा । किर्ती हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥धृ॥
भुक्ती मुक्ती तू चि एक होसि सिद्धीचा दाता । ह्मणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ।
सर्वस्वे त्याग केला धांव घातली आता । कृपादान देई देवा येउनि सामोरा आता ॥२॥
संसारसागरू गा भवदुःखाचे मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ ।
इंद्रिये वज्रघाते तपे उष्ण वरी जाळ । सोसिले काय करू दुर्भर हे चांडाळ ॥३॥
तिही लोकी तुझे नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलो वरि खोडा भाव धरूनि टेंका ।
जाणवी नरनारी जागो धरम लोका । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥
नाठवे आपपर आता काय बा करू । सारिखा सोइसवा हारपला विचारू ।
घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग