मंदिरा नेवोनि पलंगी
84.
मंदिरा नेवोनि पलंगी बैसविला । म्हणत हरीला तये-वेळी ॥१॥
ऐसिया समयी थोर तू अससी । तरी ह्लषिकेशी बरे होते ॥२॥
देखोनि तिचा भाव थोर झाला हरी । पाहूनि सुंदरी आन-दली ॥३॥
सुखशयनी राधा एकांती असता । अनया अवचिता आला तेथे ॥४॥
सक्रोध होऊनि बोलला राधेसी । कोणासी बोलसी गुजगोष्टी ॥५॥
भ्रताराचा शब्द ऐकता श्रवणी । दचकली मनी रा-धिका ते ॥६॥
हात जोडोनिया विनवित हरीसी । होई ह्लषिकेशी सान आता ॥७॥
ऐकोनि करुणा बाळ झाला हरी । दहिंभात झडकरी ठेवी पुढे ॥८॥
कवाड उघडून बोलत अनयासी । घरांत ह्लषिकेशी जेवितसे ॥९॥
कावड ठेऊनि घरांत तो आला । जेविता देखिला कृष्णनाथ ॥१०॥
नामा ह्मणे अनया आनंदला मनी । ह्लदयी चक्रपाणी धरियेला ॥११॥
