रुप विक्राळ भयानक ।
84.
रुप विक्राळ भयानक ।
चुंचु वाढिले अधिकाधिक् ।
पक्ष पसरोनिया अधोमुख ।
रक्तवर्ण व्दिनेत्र ॥१॥
क्रोधे झगडता कृष्ण शरीरी ।
येरे पक्ष धरिले करी ।
उपटूनिया सांडी पृथ्वीवरी ।
आपार वाते उसळले ॥२॥
लोक मिळाले भोवते ।
परी भिताती देखोनिया त्याते ।
मग धरुनिया चंचूते ।
दोन्ही फाळी करु पाहे ॥३॥
अनंत हस्तांचा श्रीधर ।
काय ते काउळे किंकर ।
परी तो मायावी असूर ।
खग वोडणेंसी ठाकला ॥४॥
कृष्णे लत्ताप्रहारे त्यासी ।
पाडियले तोंडघसी ।
धरुनीया निजकेशी ।
आपणासी ओढियेला ॥५॥
दक्षिणकरे मुष्ठीप्रहरी ।
हाणितले त्या शिरावर ।
मस्तक फुटता मेंदूवरी ।
शोणित वाहे भडभडा ॥६॥
निळा म्हणे दीर्घपापी ।
कागरुपिया अति विकल्पी ।
परी हा परमात्मा पुण्यप्रतापी ।
मोक्षपदासी पाठविलां ॥७॥
