येई गा बापा हरि तू ब
81.
येई गा बापा हरि तू बा कृपानिधी । दिनालागी आधी सांभाळावे ॥
आले म्हणुनी कृपादृष्टी पाही । उचलूनि घेई ये कडी बापा ॥
तूचि आमची माता तूचि आमचा पिता । तुजविण सर्वथा नेणे काही ॥
बोधला म्हणे देवा मी तुझा दिन । माझा अभिमान आहे तुज ॥
