वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › २, हरिपाठ अभंग ५८ ते ८४

सर्व सुख गोडी साही श

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074951 · अभंग क्र. ८४

84.
सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी ।
रिकामा अर्धघडी राहू नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वाया येरझार हरिवीण ॥२॥
नाम मंत्र जप कोटी जा‌ईल पाप ।
रामकृष्णी संकल्प धरुनि राहे ॥३॥
निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी ।
इंद्रियांसवडी लपू नको ॥४॥
तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान ।
समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥

अर्थ :
जर सुख हवे असेल तर सर्व शास्त्रांनी निवडलेले नाम निवडुन जपत राहिले पाहिजे त्या शिवाय रिकामा राहु नकोस. हा संसाराचा व्यवहार लटिका आहे उगाच यात येरझारा घालु नकोस. एका नाममंत्राने कोटी पापे जातात त्यामुळे कृष्णनामाचा संकल्प धारण कर. हे करताना स्वतःची वृत्ती काढुन टाकुन द्यावी व इंद्रियांच्या आड दडु नये. तीर्थव्रतांमध्ये शुध्द नामभाव धरावा. मनी करुणा असावी. शांती दया ह्यांचा पाहुणा हरि होतो त्यामुळे त्यांचा अंगिकार कर. असा हा संजिवन समाधीचा ज्ञानमार्ग असणारा हरिपाठ श्रीगुरु निवृत्तिनाथानी सांगितल्यामुळे प्रमाण मानला असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग