वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 12. राधाविलास - अभंग ७८ ते १०२

मथुरेसी गोरस विकूं ज

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090351 · अभंग क्र. ८३

83.
मथुरेसी गोरस विकूं जाता नितंबिनी । तयामाजी देखिली राधिका गौळणी । जवळी जाऊनिया धरिली तिची वेणी ॥१॥ सोडी सोडी कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा घातले पाणी । नांव रुप माझे बुडविलें जनी ॥२॥ राधा म्हणे येथोनिया बहु चावट होसी । घरी चोरी करुनियां वाटे आडविसी । ओढोनिया नेते आता तुज मातेपाशीं ॥३॥ धरिली पदरी राधा न सोडिच निरी । दान दे आमुचे म्हणे मुरारी । भोवंताली हांसती व्रज सुंदरी॥४॥ भक्तीचियां पोटी राधा समरस जाली । कृष्णरुप पाहूनिया देहभावा विसरली । एका जनार्दनी राधा शेजे पहुडली ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग