पूर्वी काय तप नेणे प
81.
पूर्वी काय तप नेणे पै हो केले । निधान जोडिले पंढरीचे ॥1॥
येऊनिया देव दळू लागे अंगे । रखुमाईचा संग दूर केला ॥2॥
तैसाचि पै संगे येऊनि बाहेरी । वेचोनिया भरी शेणी अंगे ॥3॥
ओझे झाले ह्मणूनि पाठी पितांबरी । घेऊनिया घरी आणितसे ॥4॥
ऐसे जेथे काम करी चक्रपाणी । तेथे कैची जनी नामयाची ॥5॥
