वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 12. राधाविलास - अभंग ७८ ते १०२

निमासुर वदन । शंखचक्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090349 · अभंग क्र. ८१

81.
निमासुर वदन । शंखचक्राकित भूषण । शोभवते राजीवनयन । राधेजवळी ॥१॥ नवल मांडिलें विंदान । वेदा न कळे महिमान । वेडावली दरुशने । न कळे तया ॥२॥ रत्‍नजडित पर्यंकीं । पहुडले हर्ष सुखी । नवल जाहलें ते ऐकीं । सासू आली घरां ॥३॥ वृद्धा म्हणे राधेशीं । दार उघड वेगेंशी । गुह्मा गोष्टी बोलसी । कवणाशीं आंत ॥४॥ राधा म्हणे मामिसे । गृहामध्ये कृष्ण असे । मज गमावया सरिसें । आणिला घरी ॥५॥ क्षणभरी स्थिर रहा । भरले पाये आत न या । भोजन जाहलीया । उघडितें द्वार ॥६॥ म्हणे कृष्णा आता कैसे । दारी वृद्धा बैसलीसे । लज्जा जात अनायासें उभयतांची ॥७॥ कृष्ण म्हणे राधेसी । मंत्र नाठवे मजसी । काय उपाय गोष्टिसी । सांगे तू मज ॥८॥ नेणो कैशी पडली भुली । मंत्र चळला या वेळीं ऐकोनि राधा घाबरली । दीनवदन ॥९॥ करुणा वचनें बोले राधा । विनोद नोहे हा गोविंदा । माझी होईल आपदा । जगमाजीं ॥१०॥ भक्तवत्सल मनमोहन । शरण एका जनार्दन । ऐकोनि राधेचें वचन । सान जाहला ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग