तुळशीचे बनी । जनी उक
86.
तुळशीचे बनी । जनी उकलीत वेणी ॥1॥
हाती घेऊनिया लोणी । डोई चोळी चक्रपाणी ॥2॥
माझे जनीला नाही कोणी । ह्मणुनी देव घाली पाणी ॥3॥
जनी सांगे सर्व लोका । न्हांऊ घाली माझा सखा ॥4॥