वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

दुजेपणा मिठी आपणचि उ

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-089989 · अभंग क्र. ८१

81.
दुजेपणा मिठी आपणचि उठी । कल्पना हे सृष्टि गाळू पाहे ॥१॥
ते कृष्णरूप गाढे यशोदा घे पुढे । दूध लाडेकोडे मागतसे ॥२॥
सृष्टीचा उपवडु ब्रह्मांडाचा घडु । ब्रह्मिंचा उपवडु उघडा दिसे ॥३॥
निवृत्ति उघड ब्रम्हांडामाजि लोळे । नंदाघरी खेळे गोपवेष ॥४॥

अर्थ:
एकट्या असलेल्या परमात्माने आपल्या कल्पनेने जगतरुपाचा पसारा मांडला व ते द्वैताची निर्मिती करुन स्वतःला पाहु लागले. तोच परमात्मा कृष्ण रुप धारण करून यशोदे कडे लाडाकोडाने दुध दही मागत आहे. ज्या रुपात अनंत ब्रह्मांडे आहेत.ते कृष्णरुप नंदाघरी खेळीमेळेने राहते. निवृत्तिनाथ म्हणतात ते निर्गुण परब्रम्ह गोपवेशात नानाप्रकारचे खेळ करत नंदा घरी नांदत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग