कामाचे विकिले क्रोधा
86.
कामाचे विकिले क्रोधाचे जिंकले ।
लोभाचे अंकिले सर्व भावे ॥१॥
तयासी पुसता काय देती सुख ।
अंतरी विवेक नाही जया ॥२॥
आशेलागी जया आंदन दिधले ।
ममतेचे जाले सेवक ते ॥३॥
बहेणि म्हणे तेचि ग्रासिले मायेने ।
आम्हा सोडवणे केवी होती ॥४॥
