अगाध हे कीर्ति विठ्ठ
83.
अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकांची काय सांगो ॥१॥
पुराणे भागली नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥
शेषादिका जेथे न कळेचि अंत । तेथे मी पतित काय वानू ॥३॥
चोखा म्हणे माझा नाही अधिकार । कैसा हा विचार होईल नेणो ॥४॥
