आपुलीये मनी विचारूनी
84.
आपुलीये मनी विचारूनी सर्व ।
पुसावया ठाव पाहतसे ॥१॥
जेथे पुसे तेथे संदेह तुटेना ।
करी स्थिर मना कोण ऐसा ॥२॥
शास्त्रासी पुसावे थोडे तो आयुष्य ।
कमी तो आवश्य कर्मी गोवी ॥३॥
बहेणि म्हणे ऐसी चिंता साधकासी ।
कैशी भवपाशी मुक्त होऊ ॥४॥
