वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 12. राधाविलास - अभंग ७८ ते १०२

थुरकात थुरकत चालतु ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090348 · अभंग क्र. ८२

82.
थुरकात थुरकत चालतु । राधिकेचे गळा मिठी घालितु । तयेसी चुंबन आवडी देतु । पाहता यशोदेसी मग रडतु ॥१॥ देई देई म्हणे चेंडूवातें । म्हणोनि आसडी निरीते । यशोदा म्हाणे राधे परते । का गे रडविसी कृष्णा ॥२॥ राधिका म्हणे ऐका मामिसें । याचा चेंडु मजपाशी नसे । हा क्रियानष्ट बोले भलतैसें । चेंडू मजपाशी नाही आणि तुमची असे ॥३॥ कृष्ण म्हणे झाडुनी चीर दावी । राधा झाडिता चेंडू पडिला लवलाही । म्हणे पाहे वो माझे आई । चेंडू घेउनी आण वाहेती पाही ॥४॥ यशोदेनें उचलोनि घेतिला कडेवरी । चेंडू झेलितसे सव्य अपसव्य करी । एका जनार्दनी भाव न कळे निर्धारी । लाजोनी ती राधा आली आपुले घरी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग