वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

प्रतिपाळ सप्रतिज्ञेच

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090066 · अभंग क्र. ५४

54.
प्रतिपाळ सप्रतिज्ञेचा नेम । सर्वज्ञता तम गिळीतसे ॥१॥
ते रुप सकुमार गोप वेषधर । सर्वज्ञ साचार नंदाघरी ॥२॥
त्रिपुर उदार सर्वज्ञता सूत्र । नामरुप पात्र भक्ति लागी ॥३॥
निवृत्ति संपद सर्वज्ञ गोविंदा । सूत्रमणी सदा तिथे निमो ॥४॥

अर्थ:
तो परमात्मा अज्ञानरुपी अंधकाराचा ग्रास घेऊन भक्तांचे रक्षण करण्याच्या प्रतिज्ञेला अनुसरुन त्यांचे संरक्षण करतो. तेच सर्वज्ञ साचार असलेले स्वरुप गोपाळाचे रुप घेऊन आले आहे. त्रिपुरासुराला उदार होऊन सोन्यारुप्यालोहाची शहरे देणारा तो सर्वज्ञ असुन तो सुत्ररुपाने जगाचे धारण करतो. त्याच नामरुपावर विश्वास असलेले त्याची भक्ती करतात. निवृत्तिनाथ म्हणतात तोच परमात्मा ब्रह्मांड माळेचा सुत्रमणी असुन त्याच्याशी मी एकरुप झालो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग