शीण वाटतसे मना । नार
54.
शीण वाटतसे मना । नारायणा न पाहता ॥१॥
वाया आचार विचार । सदा मलीन अंतर ॥२॥
सोंगाचे ते सोंग । दावी रंग कथेचा ॥३॥
परधनी सदा मन । वरी दावितसे डोलून ॥४॥
ऐसा नर तो दुराचारी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥
54.
शीण वाटतसे मना । नारायणा न पाहता ॥१॥
वाया आचार विचार । सदा मलीन अंतर ॥२॥
सोंगाचे ते सोंग । दावी रंग कथेचा ॥३॥
परधनी सदा मन । वरी दावितसे डोलून ॥४॥
ऐसा नर तो दुराचारी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥