कंसा मली भय संचारू ।
57.
कंसा मली भय संचारू ।
झाला तेणे चिंतातूर ।
बैसोनिया करी विचारू ।
कृष्ण्वधार्थ् प्रयोग ॥१॥
ते ऐकोनी उत्पात वार्ता ।
गोकुळींचिया लोको समस्ता ।
धैर्य नुपजेचि म्हणती आर्ता ।
जावे पळोनी दूरदेशा ॥२॥
तव नंद म्हणे ऐका मात ।
जावोनी वसो दरकुटी आत ।
साडुनिया जाता आपुला प्रांण ।
घरे दारे नुरतील ॥३॥
विचार मानला सकळांसी ।
गेली पळोनी दरकुटीयेसी ।
गावी नाही मुंगी माशी ।
ऐसे ओस पडियले ॥४॥
उष्णा वारियांचे आघात ।
साउली न मिळेचि त्या वनांत ।
तव देखिल्या अकस्मात ।
माईक गाडा श्कटासूर ॥५॥
यशोदा देखेनिया ते वेळी ।
बाळकृष्ण निजवी गाडियातळी ।
तव हा लाघवी वनमाळी ।
पद घातेचि उडविला ॥६॥
तेणे तो आक्रंदला ।
घोष् दणणिला ।
जाउनी मथुरेमाजि पडिला ।
कंस म्हणेरे शकटहि गाढा ।
आजि लाविला मृत्यूपंथे ॥८॥
निळा म्हणे गौळिये म्हणती ।
गाडा उडाला कैसिया रीती ।
तळी होता हा श्रीपती ।
थेर भाग्ये वांचला ॥९॥
