येई वो येई वो येई धा
56.
येई वो येई वो येई धावोनिया । विंलब का वाया लाविलया कृपाळे ॥१॥
विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कोठे गुंतलीस माये विश्वव्यापके ॥२॥
न करी न करी न करी आता आळस अव्हेरू । व्हावया प्रकट कैचे दुरी अंतरु ॥३॥
नेघे नेघे नेघे माझी वाचा विसावा । तुका म्हणे हांवा हांवा हांवा साधावा ॥४॥
