येतीया पुसे जातिया ध
55.
येतीया पुसे जातिया धाडी निरोप । पंढरपूरी आहे माझा मायबाप ॥१॥
येई वो येई वो विठाबाई माउलीये । निढळावरी कर ठेउनी वाट पाहे ॥२॥
पिंताबर शेला कैसा गगनी झळकला । गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला ॥३॥
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी । विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी ॥४॥
