घरोघरी चोरी करितो हृ
57.
घरोघरी चोरी करितो हृषीकेश । गार्हाणे संगिती येऊनी यशोदेसी ॥१॥ भली केली गोविंदा भली केली गोविंदा । निजभक्तालागी दखाविसी लीला ॥२॥ कवाड उघडोनि शिंके वो तोडिलें । दही दुध भक्षूनि ताक उलंडिलें ॥३॥ अंतर बाहेर मज व्यापियलें माया । एका जनार्दनी म्हणे न सोडी पाया ॥४॥
