वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 23. संत सोयराबाई › 1. संत सोयराबाई अभंग गाथा › १. संत सोयराबाई ६२ अभंग › १. संत सोयराबाई अभंग गाथा

संतासी तो खूण बाणली

🙏 23. संत सोयराबाई · ABH-075579 · अभंग क्र. ५७

57.
संतासी तो खूण बाणली तुमची । तरी का आमुची सांडी केली ॥१॥
काय साचपण मानू आता देवा । न कळे हा गोंवा उगवा कधी ॥२॥
रात्रंदिवस भ्रमले हे मन । नव्हे समाधान काय करू ॥३॥
सोयरा म्हणे आहे पंढरीनिवासा । लवकरी फांसा तोडा आता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग