आदिरुप समूळ प्रकृती
56.
आदिरुप समूळ प्रकृती नेम । वैकुंठ उत्तम सर्वत्र असे ॥१॥
ते रुप संपूर्ण वोळले परींपूर्ण । सर्व नारायण गोपवेष ॥२॥
आधारी धरिता निर्धारी धरिता । सर्वत्र पुरता एकरुपे ॥३॥
निवृत्ति साधन सर्वरुपे जाण । एतरुपे श्रीकृष्ण सेवितसे ॥४॥
अर्थ:
एकट्या परब्रह्माला जेंव्हा एकटेपण जाणवतो तेंव्हा तो प्रकृती तयार करुन जगतरुपी वैकुंठ तयार करतो. तोच परमात्मा गायी गोपाळांच्या जागी अंशात्मक रुपाने आला व संपुर्ण जगाताचे रुप परिपुर्ण केले. योग्यांनी निर्धारानी धारण केलेल्या ध्यानातुन सर्वत्र तोच अनेक रुपाने प्रकट होतो. निवृत्तिनाथ म्हणतात तोच परमात्मा जरी अनेक रुपानी प्रगट झाला तरी श्रीकृष्ण रुपात त्याला एकत्वाने पाहता येते.
