वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

दोही बाही संतांची सभ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075016 · अभंग क्र. ५६

56.
दोही बाही संतांची सभा । सिंहासनी उभा श्रीविठ्ठल ॥
गाती नारद तुंबर प्रेमे । हरीची नामे गर्जती ॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥

अर्थ :
सिंहासनावर तो श्री विठ्ठल उभा असुन त्याच्या दोन्ही बाजुला संतसभा भरली आहे. हरिनाम प्रेमाने घेत तेच नाम नारद तुंबर गात आहेत. तो रखुमाईचा पती विठ्ठल उभा राहिल्यावर त्र्यैलोकीची शोभा शोभुन दिसते असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग