शिणल्या भागलयांचा तू
53.
शिणल्या भागलयांचा तूंचि विसावा । धांवे तू केशवा मायबापा ॥१॥
किती किती मन आवरोनी धरू । परी न सुचे विचारू काय करू ॥२॥
तुम्ही तंव समर्थ आपुल्याच भारे । आमुचे खोटे खरे काय जाणा ॥३॥
मी तो बैसले तुमचिये द्वारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
