नाही छाया माया प्रकृ
53.
नाही छाया माया प्रकृतीच्या आया । मनाच्या उपाया न चले काही ॥१॥
ते रुप स्वरुप अपार अमूप । यशोदे समीप खेळतसे ॥२॥
विश्वाचा विश्वास विश्वरुपाधीश । सर्वत्र महेश एकरुपे ॥३॥
निवृत्ति सर्वज्ञ नाममंत्रयज्ञ । सर्व हाचि पूर्ण आत्माराम ॥४॥
अर्थ:
ते परब्रम्ह ज्याला चारी हि शरिरे नाहीत त्यामुळे त्याची छाया ही नाही व शरिरच नसल्याने मायेला ही परे आहे.म्हणुन तेथे मनाचा ही उपाय चालत नाही. ते स्वरुप येवे विशाल आहे की त्याचे मोजमाप नाही होत ते स्वरुप यशोदे जवळ खेळते. तो परमात्मा नुसता जगाचा विश्वास नाही तर विश्वाचे रुपचे आहे. व तोच सर्वांचा महा देव आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या सर्व जगात पसरलेल्या स्वरुपाला मी कृष्णनामात पाहातो व सतत त्याचा जप करतो.
