वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

ज्याचे गुणानाम आठवित

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074975 · अभंग क्र. ५४

54.
ज्याचे गुणानाम आठविता मनचि नाही होय ।
अनुभवाचे पाय पुढे चालती ॥
निर्गुण गे माये गुणवंत जाला ।
प्रतिबिंबी बिंबतसे चैतन्याचे मुसे ।
प्रति ठसावत ते वृंदावनी ब्रह्म असे गे माये ॥
बापरखुमादेविवरू डोळसु सांवळा ।
द्वैत अद्वैत सोहळा भोगवी गे माये ॥

अर्थ :
त्याचे गुणनाम घेतले की मनच राहात नाही व अनुभव आठवला तर पाय चालत राहतात. त्या प्रतिबिंबात चैतन्याची मुस (साचा) दिसली तो निर्गुण, सगुण होऊन आला. ते सगुण ब्रह्मरुप वृंदावनात मी पाहात आहे. तेच रुप, मला द्वैत अद्वैत रुपाचा सोहळा, माझ्या डोळ्याना दाखवणारा, तो सावळा रखुमाईचा पती व माझा पिता आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग