आपुलिया हिता जो असे
57.
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥२॥
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ॥३॥
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाही ॥४॥
