वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

ऐसे देव आणि ऋषेश्वर

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089873 · अभंग क्र. ५६

56.
ऐसे देव आणि ऋषेश्वर ।
हर्ष होऊनिया निर्भर ।
नंदयशोदेचे वारंवार ।
वर्णिती भाग्य निजमुर्खे ॥१॥
न संपडे जो योगसाधने ।
नाना तपे वेदाध्ययने ।
तो हा सगुणरुपे नारायण ।
क्रिडा करी याच्या घरी ॥२॥
यावरी गौळणीही अति सुंदरा ।
कडिये घेउनी शारंगधरा ।
नेती उल्हासे निजमंदिरा ।
चुंबने देऊनि खेळविती ॥३॥
म्हणति कृष्णा रामा मेघ:शामा ।
योगी मुनिजन मनोरमा ।
सुलभ झालासी आजि तू आम्हा ।
आवडी ऐसा वर्तसी ॥४॥
पूर्वाजिंते उत्तमे होती ।
सकृते त्यांचिया फळनिष्पत्ती ।
मोडोनी आलिया तुझी हू मूर्ती ।
डोळेभरी अवलोकूं ॥५॥
ऐशिया उत्साहे त्या प्रमदा ।
नेती खेळविती गोविंदा ।
मग पावोनिया परमानंदा ।
शयनी पर्यंकी निजविती ॥६॥
निळा म्हणे सुख विश्रांति ।
पावल्या ऐशिया सत्संगती ।
पुढील कथा अपूर्व ख्याती ।
बाळपणींची हरिकीर्ती ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग