गर्गागमन व नंदप्राथन
54.
गर्गागमन व नंदप्राथना.
आले गोकुळासी । हर्ष न माये मानसी ॥१॥
नंदे गर्गाते देखिले । पूजा स्तवनी तोषविले ॥२॥
भूतभविष्यवर्तमान । तुह्मा कळती हो संपूर्ण ॥३॥
पाहा सामुद्रिक लक्षण । याचे कांही सांगा चिन्ह ॥४॥
बोले तेव्हा तो नंदाशी । झणी कळेल कंसासी ॥५॥
रोहिणीनंदादि वैसती । ऐकावया जातक चित्ती ॥६॥
घालू-निया मंगलस्नान । आरंभी पुण्याहवाचन ॥७॥
ऐसी वदे शुकवाणी । नामा ह्मणे ऐका कानी ॥८॥
