हासोनिया राधा बोले य
56.
हासोनिया राधा बोले यशोदेशी । यह ओ हा चोर बोल विश्वासी ॥१॥ आण वाहतसे लटकीची मामिसे । याचिया वचनी सर्वास विश्वासे ॥२॥ खोडी न करी ऐशी वाहे तू आण । गोरसांवांचुनि चोरी न करी तुझी आण ॥३॥ एका जनार्दनी बोले विनोद वाणी । यशोदेसह हांसती गौळणीं ॥४॥
