वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

नामसंकीर्तन सर्वकाळ

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076026 · अभंग क्र. ५७

57.
नामसंकीर्तन सर्वकाळ जया ।
भक्तिवंत तया म्हणो आम्ही ॥१॥
क्षण एक नाही नामेविण वाचा ।
सोस हा भक्तीचा सर्वकाळ ॥२॥
नेत्री हरिध्यान मुखी ते कीर्तन ।
सर्वदा श्रवण मोक्षशास्त्रे ॥३॥
सेवा घडे हाते पायी प्रदक्षिणा ।
विश्रांती धारणा आत्मयाची ॥४॥
आठही प्रहर नाही आराणुक ।
संताघरी रंक होउनि ठेला ॥५॥
बहेणि म्हणे भक्ति खरी मोक्षदाती ।
पाहिजे संगती संतसेवा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग