वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

मी ज्ञानेसि विज्ञान

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090096 · अभंग क्र. ५५

55.
मी ज्ञानेसि विज्ञान रुपेंसि सज्ञान । ध्यानेंसि धारणा हारपली ॥१॥
ते रुप संपुर्ण वोळले हे खुण । नंदासी चिद्गन वर्षलासे ॥२॥
अरुप सरुप लक्षिता पै माप । नंदा दिव्य दीप उजळला ॥३॥
निवृत्ति संपूर्ण नामनारायण । सच्चिदानंदघन सर्व सुखी ॥४॥

अर्थ:
त्या स्वरुपाच्या ठिकाणी ईश्वर स्वरुपाचा निर्णय करणारे विज्ञानासहित स्वरुप सांगणारे स्वरुप ज्ञान व प्रकृतीच्या तत्वे सांगणारे सुक्ष्म ज्ञान ध्यानासह लयाला जाते. त्या परमात्म्याने नंदा घरी येऊन सर्वांवर चैतन्याचा वर्षाव केला.ज्याच्या अरुप स्वरुपा ला माप नाही तो प्रत्यक्ष नंदाकडे वंशरुप दिप होऊन तेवत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या नारायण नामाचा जप केला तर सच्चिदानंद सहज प्राप्त होतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग