प्रकरण :- ॥ पंढरी॥
56.
प्रकरण :- ॥ पंढरी॥
अवघी पंढरी भूवैकुंठ नगरी । नांदतसे हरि सर्वकाळ ॥१॥
चतुर्भुज मूर्ति शंख चक्र करी । पीतांबरधारी श्यामवर्ण ॥२॥
श्रीमुख शोभले किरीट कुंडले । तेंचि मिरवले चंद्रसूर्य ॥३॥
पितांबरी कांसे सोनसळा विराजे । सर्वागी साजे चंदनउटी ॥४॥
मिरवले कर दोनी कटावरी । ध्यान ते त्रिपुरारि ध्यात असे ॥५॥
सनकादिक भक्त पुंडलिक मुनीसुखसमाधानी सर्वकाळ ॥६॥
आनंदाचा कंद उभा विटेवरी । चोखा परोपरी नाचतसे ॥७॥
