संताचे वचनी दृढ जया
56.
संताचे वचनी दृढ जया भाव ।
भक्ति अभिनव हेचि खरी ॥१॥
सांगितली खूण आइके जो मनी ।
पावेल निर्वाणी तोचि एक ॥२॥
संताचे वचन शास्त्राचे आधारे ।
भक्तिचे निर्धारे दृढ व्हावे ॥३॥
बहेणि म्हणे संतापायी जया अर्त ।
हाचि भक्तिपंथ वोळखावा ॥४॥
