भक्ति हे कारण साध वर
55.
भक्ति हे कारण साध वरिष्ठ ।
रोकडे वैकुंठ हाती वसे ॥१॥
स्थिर करी चित्त प्रेम अखंडित ।
पावसी अच्युतपद पाहे ॥२॥
भक्तीपासी ज्ञान वैराग्य आंदणे ।
सर्वही साधने लया जाती ॥३॥
बहेणि म्हणे भक्ति विरक्तीचे मूळ ।
चित्त हे निश्चळ करी का रे ॥४॥
