पुढे ऋषिश्रवरांची मा
55.
पुढे ऋषिश्रवरांची मांदी ।
बैसली होती सभासंधी ।
तेही आशिर्वाद शब्दी ।
मंत्रघोषी गर्जिन्नले ॥१॥
मंगळतु-यांचे घोषगजर ।
दुंदभी वाजविती सुरवर ।
नंदरायाचे भाग्य थोर ।
देव वर्णिती निज मुखे ॥२॥
निगम येउनि मूर्तिमंत ।
श्रीकृष्णाची स्तवने करीत ।
कामधेनुही क्षीरे स्त्रवत ।
तुप्ति सकळांसी दयावया ॥३॥
देवगुरु जे बृहस्पती ।
तेहि़ अर्शिर्वादे कृष्णाते स्तविती ।
शुक्राचार्यही प्रज्ञामूर्ति ।
कृष्णाचे वर्णिती कीर्तिघोष ॥४॥
उमा रमा रेणुका सती ।
लोपामुद्रा अरुंधती ।
अक्षवाणे घेऊनिया हाती ।
आत्मया ओवाळिती श्रीकृष्णा ॥५॥
अनसूर्या परम प्रतिव्रता ।
अत्रिदेवाची जे कांता ।
जिचिये उदरी श्रीअवधूता ।
दत्तात्रय जन्म महामूनी ॥६॥
निळा म्हणे तेहि येउनी ।
हराते वोसंगा घेउनी ।
आशिर्वादे अमृतवचनी ।
गौरविती यशोदे ॥७॥
