पारधियासी तेव्हा दाट
54.
पारधियासी तेव्हा दाटला गहींवर । लोटले अपार प्रेम तेव्हा ॥१॥
जीवदान दिल्हे जावे तुम्ही आता । न करावी चिंता कांही येथे ॥२॥
इंद्राचा मी दूत चुकलो सेवेसी । यालागी जन्मासी आलो जाणा ॥३॥
तुमचिया बोले निवाले अंतर । घात इत:पर न करी कांही ॥४॥
नामा ह्मणे शुभकाळ त्याचा आला । ह्मणवोनि झाला पश्चात्ताप ॥५॥
