आजि देखिले रे आजि दे
57.
आजि देखिले रे आजि देखिले रे ॥
सबाह्य अभ्यंतरी । अवघा व्यापकु मुरारी ॥
दृढ विटे मन मुळी । विराजीत वनमाळी ॥
आजि सोनियाचा दिनु । वरी अमृताते वरिषे धनु ॥
बरवा संतसमागमु । प्रकटला आत्मारामु ॥
बाप रखुमादेविवरू । कृपासिंधु करुणाकरू ॥
अर्थ :
अंतर्बाह्य व्यापुन असलेला तो मुरारी आज मी पाहिला. त्या विटेवर दृढ उभा असलेला तो वनमाळी आहे. आज माझ्यासाठी त्यामुळे सोन्याचा दिवस आहे. तो मेघ स्वरुप होऊन आमच्यावर अमृताचा वर्षाव करतो. त्या संतसमागमालाठी तो आत्माराम प्रगट झाला आहे. तो कृपा करणारा कृपासिंधु रखुमाईचा पती व माझा पिता आहे असे माऊली सांगतात.
