वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 38. महाबळभट विटंबना

महाबळभट विटंबना.

🙏 4. संत नामदेव · ABH-083166 · अभंग क्र. ५६

56.
महाबळभट विटंबना.

श्रीकृष्ण जन्मला वार्ता ही ऐकोनी । चिंता कंसा मनी प्रवर्तली ॥१॥
उद्विग्न मानसी कंस तो बैसला । सन्मुख देखिला महाबळ ॥२॥
गौरवोनी त्यासी सांगे वर्तमान । शत्रूसी जाऊनि कोण मारी ॥३॥
महाबळ दैत्य प्रतिज्ञा बोलत । शत्रूसी त्वरित मारीन मी ॥४॥
नामा ह्मणे ऐसा बोलूनि निघाला । वेष धरिला तेणे कपट ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग