वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 35. तृणावर्त वध

तृणावर्तवध.

🙏 4. संत नामदेव · ABH-083264 · अभंग क्र. ५३

53.
तृणावर्तवध.

कंसे पाठविला आला तृणावर्त । धुळीने समस्त व्यापि-येले ॥१॥
दुष्टबुद्धि तेव्हा उचली देवासी । धरियेले त्यासी कंठी देवे ॥२॥
यशोदा पाहात न दिसे श्रीकृष्ण । ऊर बडवून शोक करी ॥३॥
गौळणींचा मेळा मिळाला समस्त । कोणी कृष्णनाथ नेला सये ॥४॥
न लगे घरदार बुडाला संसार । दावा गे श्रीधर तान्हे माझे ॥५॥
ठावे असते ऐसे बांधित्ये पोटासी । कोठेम गुंतलासी बाळा माझ्या ॥६॥
धांवा गे धांवण्या पाहा गे लेंकरू । शोक अनिवारू करीतसे ॥७॥
शिणल्या भागल्या येतो तुह्या घरा । मुख हे उदारा दावी कृष्णा ॥८॥
सांडू पाहे प्राण यशोदा सुंदरी । हंबरडा मारी वत्सालागी ॥९॥
चेपोनी नरडे गतप्राण केला । भूमीसी पाडिला दैत्य तेव्हा ॥१०॥
नामा ह्मणे वरी खेळत गोविंद । पाहोनी आनंद सकळांसी ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग