नको करु आता कृष्णा त
55.
नको करु आता कृष्णा तु खोडीं । नाही म्हणोनिया दोनी हात जोडी ॥१॥ काल इचे गृहीं थोडें खादले नववीत । म्हणोनि राधिकेचे स्तनी ठेवी हात ॥२॥ येवढाचि गोळा कढिला बाहेरी । सत्य म्हणोनिया आण वाहतो हरी ॥३॥ एका जनार्दनी विश्वव्यापक सांवळा । न कळे ब्रह्मादिका याची अगम्य कळा ॥४॥
