गर्ववर्णितभविष्य
55.
गर्ववर्णितभविष्य
जन्मजन्मांतरी झाला तुज श्रम । ह्मणोनिया ब्रह्म आले येथे ॥१॥
राखतील गाई मारीतील दुष्ट । न करी बोभाट जनामध्ये ॥२॥
द्वादश गांव अग्नि करील प्राशन । वांचतील प्राण सकळांचे ॥३॥
चोरोनिया गाइ नेईल सौंगडे । लावील हा वेड ब्रह्मयासी ॥४॥
उचलील हा पर्वत हरील हा गर्व । तारील हा सर्व नाममात्रे ॥५॥
समुद्री हा नगरी रचील क्षणांत । चरित्र अद्भुत करील हा ॥६॥
सोळा सहस्र शत अष्ट नायिका । करील बाईका तुझा कृष्ण ॥७॥
त्रैलोक्यांत हाची उदाराचा राणा । देईल ब्राह्मण हेमपुरी ॥८॥
सांगुनिया ऐसे आशीर्वाद देऊनि । नामा म्हणे. मुनि जाता झाला ॥९॥
